PostImage

Pankaj Lanjewar

Aug. 31, 2023   

PostImage

रक्षाबंधन एका आगळ्यावेगळ्या प्रकारे खाकी वर्दीतले कर्मचारी यांना राखी बांधून …


 

माजलगाव दि.30.08.2023. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे खाकी वर्दीतले सर्व कर्मचारी यांना दरवर्षीप्रमाणे बहिन भावाचं नातं  जपण्यासाठी ममता  दता शिंगाडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला शहराध्यक्ष व संध्याताई भांडेकर यांनी राखी बांधून सर्व पोलीस कर्मचारी यांना रक्षाबंधन साजरी केले. भारतीय संस्कृती प्रमाणे बहिणीचे रक्षण भावाने करावे प्रत्येक सुखा दुःखात भावाने धावून यावे यासाठी राखी रुपी धागा बांधून तुम्ही माझं रक्षण करावं असा अनन्य साधारण महत्व या राखी पौर्णिमेला दिला जातो यासाठी कितीही लांबची बहीण मानलेली असो सखी असो या गुरु बहीण आसो बहीण भावासाठी राखी बांधण्यासाठी आपल्या माहेराकडे येऊन राखी बांधत असते आपल्या भावासाठी बहीण देवाकडे मागणं करीत देखील तेव्हा माझ्या भावाला सुखाचे ठेव. प्रत्येक संकटकाळी माझ्यासाठी उभा राहील अशी ताकद माझ्या भावाला दे असं प्रत्येक बहिणीला वाटतं जो भाव बहिणीचे प्रेम टिकून ठेवत आहे भारतीय संस्कृती आज पण जशास तसे टिकून आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथील डी वाय एस पी श्वेता खाडे पीएसआय गांजले सर पीएसआय रंजीत कासले सर सह पोलीस निरीक्षक संजय राठोड सह पोलीस निरीक्षक उबाळे सर पोलीस पीएसआय ऐटवार नाना पीएसआय गिलबिले सर या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ममता दत्ता शिंगाडे व संध्याताई भांडेकर यांनी दरवर्षीप्रमाणे सर्व पोलीस कर्मचारी यांना ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रक्षाबंधन हा सण साजरा केला.